Pune Accident News : पुण्यात नवले पुलाजवळ भरधाव ट्रकची वाहनांना जोरदार धडक; भीषण अपघातात एकाचा मृत्यू

Pune Accident News : पुण्यातील नवले पुलाजवळ सिग्नलला उभ्या असणाऱ्या वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. ट्रकची जोरदार धडक बसल्याने सिग्नलला उभी असलेली वाहने एकमेकांवर आदळलीत. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कात्रज देहू बाह्यमार्गावर कात्रज चौकाकडून येणारा सिमेंटने भरलेला ट्रक भरधाव वेगात होता. नवले पुलाजवळ चौकात पोहचल्यावर ट्रकने सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांना जोराची धडक दिली. यामध्ये सलग उभी असलेली ५ वाहने एकमेकांवर आदळली.

Shahapur Bus Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या तीन बसचा भीषण अपघात, 25 जण जखमी

या दुर्घटनेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून संदेश बानदा खेडेकर असे तरुणाचे नाव आहे. अपघातग्रस्त वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्याची व्यवस्था केली. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी सिंहगड वाहतूक विभागाचे कर्मचारी अधिकारी हजर असल्याने तात्काळ मदत मिळाली.

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी...

बुलढाण्यात देखील अपघाताची अशीच एक थरारक घटना समोर आलीये. चिखली तालुक्यातील शिरपूर येथील दोन तरुण दुचाकीने बुलढाणाच्या दिशेने होते. त्यावेळी केळवद जवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात २० वर्षीय तेजसचा जागीच मृत्यू झालाय. तर राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशन संदीप शेळके यांनी घटनास्थळावरून गंभीर जखमी असलेल्या सार्थक सुनील हिवाळे याला तात्काळ रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. त्याच्यावर सध्या बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply