Pune Accident : किवळेजवळ होर्डिंग कोसळून ५ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाखांची मदत

Pune Accident : पिंपरी चिंचवडमध्ये किवळेनजीक लोखंडाचं होर्डिंग कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन लोक जखमी झाले आहेत. मृतांना आता मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये CM शिंदे म्हणतात, "कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे."

हा अपघात सोमवारी संध्याकाळी रावेत किवळे भागामध्ये मुंबई पुणे महामार्गावरील सर्विस रोडवर झाला. सोमवारी या भागात जोराचे वारे वाहू लागले. पावसाचं वातावरण झालं होतं. त्यामुळे होर्डिंगखाली असलेल्या एका दुकानात काही लोक थांबले होते. तेव्हा अचानक होर्डिंग पडलं आणि हा अपघात झाला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply