Pune Accident Case : अल्पवयीन मुलाला तत्काळ जामीन देणं भोवणार? बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची होणार चौकशी

Pune Accident Case : पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाला १५ तासांतच जामीन मंजूर करणं बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे. कारण, या सदस्यांची चौकशी करा, असे आदेश महिला आणि बाल न्याय मंडळाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. यासाठी समिती देखील गठीत करण्यात आली आहे.

आता ही चौकशी समिती या प्रकरणाची पूर्णपणे पडताळी करणार आहे. यासंदर्भातील अहवाल आयुक्त नारनवरे यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलाला जामीन तत्काळ जामीन मंजूर करणं बाल न्याय मंडळातील सदस्यांच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे.

Pune Porsche Accident : पुणे पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; डिजीटल पुराव्यांसाठी AI चा वापर, पोलिसांचा महत्वाचा निर्णय

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल याच्या मुलाने सुसाट कार चालवत दोन जणांचा जीव घेतला. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा अल्पवयीन मुलाने दारू ढोसली होती, असं तपासातून समोर आलं. कल्याणीनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली.

या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर आतापर्यंत जवळपास १० जणांना अटक करण्यात आली. यामध्ये अल्पवयीन मुलाच्या कुटुंबातील काही सदस्यांसह ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या ससूनमधील दोन डॉक्टरांचा देखील समावेश आहे. सध्या पोलीस अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची चौकशी करीत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, चौकशीत आतापर्यंत अनेक खुलासे समोर आले आहेत. दरम्यान, या अपघातानंतर पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केलं होतं. त्यांनी आरोपीला १५ तासांत जामीन मंजूर केला होता. तसेच त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहून वाहतूक नियमाचे धडे घेण्याचे आदेश दिले होते.

बाल न्याय मंडळाच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती. दारू पिऊन रस्त्यावर सुसाट कार चालवत दोन जणांचा जीव घेणाऱ्या आरोपीला इतक्या लवकर जामीन कसा दिला जाऊ शकतो, त्याची चौकशी का केली जात नाही? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. यावरून बाल न्याय मंडळावर जोरदार टीका झाली होती. आता या मंडळातील सदस्यांची चौकशी केली जाणार आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply