
Pune-Ahmednagar Road Accident : पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. कोरेगाव भीमा येथील वाडा पुनर्वसन जवळ एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे अपघातस्थळी मदतीसाठी येणाऱ्या भरधाव रुग्णवाहिकेने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील व्यक्ती सुद्धा जीवास मुकला.
तर, रुग्णवाहिकेचा चालक आणि त्याशेजारील बसलेला एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात होत आहे. हा महामार्ग मृत्युचा सापळा बनत चालला आहे.
आज (27 जानेवारी) दुपारच्या सुमारास कोरेगाव भिमा येथील वाडा पुनर्वसन फाट्यावरील छञपती ऑटो गॅरेज समोर येथे भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दुचाकीस्वार महेश राजाराम गव्हाणे याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात कारचालक शंकरसन श्रीनरहरी राऊत (रा.लोहगाव पुणे) हे देखील जखमी झाले. या अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांसह रुग्णवाहिकेला दिली. दरम्यान, अपघातस्थळी मदतीसाठी येत असलेल्या भरधाव रुग्णवाहिकेने कल्पेश वनज काटयाजवळ एका दुचाकीस्वाराला धडक दिली.
या धडकेत दुचाकीस्वार श्रीकांत सुर्यकांत उबाळे (वय २६ वर्ष ,रा.ढेरंगेवस्ती कोरेगाव भिमा) याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीला धडक देऊन रुग्णवाहिका उलटल्याने चालक आणि त्याच्याशेजारील व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी महेश गव्हाणे यांच्या अपघाताबाबत संतोष काळुराम गव्हाणे यांनी फिर्याद दिली असून श्रीकांत उबाळे यांच्या अपघाताबाबत प्रशांत सूर्यकांत उबाळे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करीत आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
