Pune Rain : ताम्हिणीत पावसाची 'बॅटिग'; महिनाभरातच ओलांडला ५००० मिलीमीटरचा टप्प, पुढील चार दिवस पावसाचे

 

Pune  : वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे जुलैमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात पुण्यात सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली. जून, जुलैमध्ये शहरात ६१६ मिलीमीटर पाऊस पडला. जुलैमध्ये जिल्ह्यातील घाट माथ्यावर ताम्हिणी घाटात सर्वाधिक पाच हजार मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. धरणक्षेत्रातही जोरदार बरसलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी आणि प्रशासनालाही सुखद दिलासा मिळाला.

‘आयएमडी’चा अंदाज खरा

यंदा पुण्यासह मध्य महाराष्ट्रात मान्सून वेळेत दाखल झाला. जूनमध्ये महिनाभर पावसाने चांगली हजेरी लावली. पुण्यात (शिवाजीनगर) जूनअखेरपर्यंत २५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत ८० मिलीमीटर अधिक पाऊस झाला. जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस नोंदवला जातो. जूनमध्ये सरासरी ओलांडलेला पाऊस जुलैमध्येही सरासरीपेक्षा अधिक बरसणार असल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिले होते. त्यानुसार, आतापर्यंत महिनाभरात विक्रमी पाऊस नोंदवला गेला.दोन महिन्यांत ६१६ मिमी पाऊस

Alibaug : राज्यातील धान्य वितरण दहा दिवसांपासून ठप्प, काय आहे कारण जाणून घ्या



जुलैमध्ये सरासरी १८० मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा ३६४ मिमी पाऊस पडला. जून, जुलैमध्ये एकत्रित सरासरी ३४० मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना यंदा दोन्ही महिन्यात ६१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात बुधवारी (२४ जुलै) चोवीस तासांत शहराच्या बहुतांश भागांत शंभर ते सव्वाशे मिलीमीटर पाऊस पडल्याने महिन्याची आकडेवारी वाढली. घाट माथ्यावरही महिनाभर जलधारा बरसल्या. ताम्हिणीत या पूर्वी आठ हजार मिमीपर्यंत पाऊस पडला होता. यंदा अनुकूल घडामोडींमुळे पावसाने समाधानकारक हजेरी लावून ५,०२३ मिमीचा टप्पा ओलांडला. लोणावळ्यात तीन हजार मिमीहून अधिक पाऊस नोंदवला गेला.

धरणसाठ्यात मोठी वाढ

दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाची रिपरिप आणि तर कधी संततधार हजेरी असे जुलैमध्ये अनुभवायला मिळणारे वातावरण यंदाही पुणेकरांनी अनुभवले. गेल्या वर्षी मात्र पावसाने ओढ दिल्याने जून, जुलैमध्ये पावसाला सरासरी गाठणेही शक्य झाले नव्हते. यंदा संपूर्ण हंगामाचा म्हणजे जून ते सप्टेंबर अखेर असा चार महिन्यांचा पाऊस दोन महिन्यांतच पडला. शहराबरोबर, जिल्हा आणि धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस झाल्याने धरणसाठ्यात समाधानकारक वाढ झाली.पुढील चार दिवस पावसाचे

शहरात मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि रिपरिप सुरू होती. दुपारी आणि संध्याकाळी दोन तीन वेळा मोठ्या सरींनी हजेरी लावली. दोन दिवसांच्या तुलनेत मंगळवारी तापमानात थोडी वाढ होऊन कमाल २७.६ आणि किमान २३.७ अंश सेल्सिअल तापमानाची नोंद झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत ५.६ मिमी पाऊस पडला. पुढील चार दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply