Pune : पुण्यात महर्षी नगरमध्ये LPG सिलेंडरला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

 

पुणे : पुण्यातील महर्षी नगर परिसरात LPG गॅस सिलेंडरला आग लागल्याची एक भीतीदायक घटना घडली असून, अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:३० वाजता महर्षी नगर, पुणे ३७ येथील २५/२०३ या घरात अचानक LPG गॅस सिलेंडरला आग लागली. प्राथमिक तपासात सिलेंडरच्या रेग्युलेटरमधून गॅस गळती (Leakage) होत असल्याने ही आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच जनता अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत कौशल्याने ‘ब्लँकेटिंग’ पद्धतीचा वापर करत आग आटोक्यात आणली. तसेच एक होज लाईनद्वारे कूलिंग करत सिलेंडर पूर्णपणे सुरक्षित केला आणि घराबाहेर काढला.

दरम्यान, संबंधित गॅस एजन्सीलाही तात्काळ कळवण्यात आले. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून रेग्युलेटर काढून गॅस लिकेज पूर्णपणे थांबवले.

या घटनेत घरमालक पुष्पा बबनराव कानिटकर (वय ५५) या स्वयंपाक करत असताना किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्या हाताला आणि बोटांना भाजल्याची माहिती आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या ऑपरेशनमध्ये प्रभारी अधिकारी अमोल कर्डेकर तसेच फायरमन अरुण धनवडे, जयेश गांगोडा, अमित रासकर, निरंजन घोरपडे आणि अथर्व काटे यांनी धाडसाने कामगिरी बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले.

अग्निशमन दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, LPG सिलेंडर आणि रेग्युलेटरची नियमित तपासणी करावी. गॅस गळतीचा संशय आल्यास त्वरित गॅस एजन्सीशी संपर्क साधावा आणि कोणतीही हलगर्जीपणा करू नये.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : पुण्यात महर्षी नगरमध्ये LPG सिलेंडरला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

Leave a Reply to Keith446 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *