Pune : पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी


Pune : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच आणखी एका घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. मद्यधुंद चालकानं थेट वाहतूक विभागाचे डीसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीला धडक दिली आहे. हा अपघात केशवनगर परिसरात शनिवारी रात्री सुमारे दहा ते साडेदहा वाजेदरम्यान झाला.

या अपघातात गाडीचे प्रचंड नुकसान झालं आहे. तसेच डीसीपी हिम्मत जाधव यांच्या मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी आरोपी मद्यधुंद चालकाविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपास करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्यामुळे आरोपींवर ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ या कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

९ दिवसांच्या बाळाला सोडून महिला बेपत्ता

पुण्यातील वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा खंबाट (वय 24) ही महिला आपल्या ९ दिवसांच्या बाळाला सोडून घरातून बेपत्ता झाली आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वीच तिची डिलिव्हरी झाली असून, सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर तिचे टाके अद्याप काढलेले नाहीत. वाघोली पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *