Pune rains : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शाळांना सुट्टी, पुढील काही तासात मुसळधार

Pune  : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आज २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पाण्याच्या प्रवाहासोबतच एक कुत्रा देखील वाहून गेल्याची घटना घडली आहे.

Laxman Hake: “शरद पवार आणि मनोज जरांगेंची सेम लाईन, माझ्याकडून लिहून घ्या ते..”, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण ८८.५३ टक्के भरले आहे. खडकवासला धरण साखळीत गेल्या २४ तासांत दीड टीएमसीची भर पडली आहे. मुठा - पानशेत खोयासह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने धरण साखळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. खडकवासला धरणात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ८८.५३ टक्के पाणीसाठा झाला होता.

कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

पानशेत - ६४.६४ टक्के
वरसगाव - ५०.६६ टक्के
खडकवासला - ८८.६३ टक्के
टेमघर - ४४.४१ टक्के

जिल्ह्यात २४ तासांतील पाऊस

लोणावळा १३४, लवासा १३४, निमगिरी ५८, चिंचवड ३९.५, माळीण ३४.५, खेड २५.५, तळेगाव २३, एनडीए २१, राजगुरुनगर १७, वडगाव शेरी १४, दापोडी १३.५, पाषाण १२.२, शिवाजीनगर १५, तळेदाव ढमढेरे ७, हडपसर ६.५.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply