Pune : पुणे महापालिकेचा रिचार्ज संपला? ११०० अधिकाऱ्यांच्या फोनचे आउटगोइंग बंद! कारण काय?

Pune : पुणे महापालिकेतील तब्बल ११०० अधिकाऱ्यांच्या मोबाईल फोनवरील आउटगोइंग कॉल सेवा सोमवारी दुपारी अचानक बंद झाली. ही सेवा बंद होण्यामागे मोबाईल बिल न भरल्याचे कारण समोर आले आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांचे तब्बल ११०० मोबाईलचे आउटगोइंग बंद झाले असून, याची माहिती महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून संबंधित क्रमांकांवर मोबाईल कंपनीकडून ‘बिल न भरल्यास सेवा बंद होईल’ अशा स्वरूपाचे मेसेज येत होते. मात्र, सोमवारी दुपारी १ वाजेनंतर या सर्व क्रमांकांची आउटगोइंग कॉल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे अनेक अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.

 

घटनेनंतर संबंधित बाब महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply