Pune : कोंढव्यात भरधाव वाहनाने १३ वर्षाच्या मुलाला चिरडले, संतप्त जमावाने चालकाला फोडले

Pune : पुण्यातील कोंढवा परिसरात अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. एका भरधाव चारचाकी वाहनाने एका १३ वर्षीय मुलाला चिरडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून, कार चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

निवृत्ती बाजीराव किसवे (वय वर्ष १३) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना १८ मे रोजी सायंकाळच्या सुमारास भोलेनाथ चौक परिसरात घडली. प्रत्यक्षदर्शींनुसार, इनोव्हा वाहन भरधाव वेगाने चालवले जात होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरून पायी चालत असलेल्या निवृत्ती याला जोरदार धडक बसली. धडकेमुळे तो रस्त्यावर दूर फेकला गेला आणि जागीच मृत्यू झाला.

Monsoon Update : पुण्यात अवकाळी पावसाच्या सुखद सरी, आणखी 'इतके' दिवस पाऊस पडणार; नागरिकांना दिलासा

स्थानिक लोकांनी पाहताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच चालकाला पकडून त्याला चांगलाच चोप दिला. तसेच त्याच्या वाहनाचीही तोडफोड केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी तपास करून जैद नसीर शेख (वय वर्ष २३) या आरोपीला अटक केली. चालकाने मद्यप्राशन केले होते का? याचा तपास सध्या सुरू असून, कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. रस्त्यावरील वेग आणि वाहतुकीच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply