Pune News: राज्यात एकाच दिवशी ३ तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू, खेड, पिंपरी-चिंचवड अन् मावळमध्ये हळहळ

Pune : पुणे जिल्ह्यातील खेड, पिंपरी-चिंचवड, आणि मावळ या तिन्ही वेगवेगळ्या भागांमध्ये पाण्यात बुडून तीन युवकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे संबंधित परिसरात शोककळा पसरली आहे. खेड तालुक्यात २६ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. तर, पिंपरी चिंचवडमध्ये नदीपात्रात बुडून एका २९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. मावळमध्येही एका १३ वर्षीय युवकाचा बुडून मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

२६ वर्षीय युवकाचा मृत्यू

खेड तालुक्यातील भरणे येथील चोरद नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. देवेंद्र दिलीप राणे असे युवकाचे नाव असून, शिवसेना शिंदे गटाच्या खवटी विभागप्रमुख दिलीप राणे यांचा तो मुलगा आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राणे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या घटनेने तुळशी गावावर शोककळा पसरली आहे.

Mumbai Airport: मुंबई एअरपोर्ट आणि ताज महल हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिस यंत्रणा सतर्क

२९ वर्षीय युवकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडच्या दापोडी रेल्वे स्टेशनजवळील मुळा नदीपात्रात २९ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. उल्हास शिंगाडे असे युवकाचे नाव असून, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाने रात्री उशिरापर्यंत बचावकार्य केलं, मात्र अंधारामुळे ते थांबवावे लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह हाती लागला, पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.

 

१३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

देहूगावमधील बोडकेवाडी बंधाऱ्यावर पोहण्यासाठी कुटुंबासह गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विष्णू गुप्ता असे त्या दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. गुप्ता कुटुंब पोहण्यासाठी बोडकेवाडी बंधारा देहूगाव येथे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गुप्ता कुटुंबातील ५-६जण पाण्यात बुडू लागले. मात्र, सोनू गुप्ता तसेच त्याच्या एका साथीदाराने मिळून चार ते पाच जणांचा जीव वाचवला. मात्र विष्णू गुप्ता याला वाचण्यात अपयश आले. वन्यजीव संरक्षण संस्था मावळ आणि देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तासांच्या शोधमोहीमीनंतर विष्णूचा मृतदेह सापडला आणि वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply