Pune Crime : माझ्या आईला पप्पांनीच मारलं; राकेशनं बबीताला का मारलं? पुण्यातील दुचाकीवरील मृतदेहाचं गूढ उलगडलं

Pune : पुण्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. पतीने मध्यरात्री बायकोचा गळा दाबून खून केला. त्यानंतर हे कृत्य लपवण्यासाठी योजना आखली. पण त्याचं बिंग फुटलं. आरोपी नवरा मृतदेह दुचाकीवर नेत होता, त्यावेळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी नांदेड सिटी अन् आंबेगाव परिसरात पसरली अन् एकच खळबळ उडाली. मात्र, आता या हत्येचं गूढ उलगडलं आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम सांगताना पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल म्हणाले की, 'काल नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. लायगुडे मळा परिसरातील समृध्दी सोसायटीत हे जोडपं गेल्या दीड वर्षांपासून राहत होतं. आरोपी राकेशनं राहत्या घरात बबीताची हत्या केली. दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत.

Kalyan Rain: कल्याणमध्ये वादळी वाऱ्याचा फटका, रिक्षावर झाड कोसळलं; ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू

दीड वर्षापासून ते पुण्यामध्ये राहायला आलेले होते. घटना घडली त्या दिवशी दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता. सोमवारी रात्री आरोपी राकेशच्या वडिलांचा फोन आला होता. त्यांनी फोनवरून मुलगा राकेशकडे पैसे मागितले, मात्र, पत्नी बबीताने राकेशच्या वडिलांना पैसे देण्यासाठी नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या नवरा-बायकोच्या वादानंतर बबिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा प्रयत्न फसला. मात्र, यानंतर संतापलेल्या राकेशनं बबीताची हत्या केली.

मृतदेह कोणाचा आहे? कुठून आला आहे ? तू कुठे घेऊन चाललाय? या सगळ्याची चौकशी करत असताना राकेशने उडवाउडवीची उत्तर दिली. मित्राने हा मृतदेह मागवला आहे, त्याला खेडशिवापूर जवळ नेऊन देतो असं त्याने सांगितलं. मृत पत्नीने फाशी घेतली असल्याचंही त्याने आधी पोलिसांना सांगितलं. मात्र, पोलिसांना पुन्हा संशय बळावला आणि त्याच्याकडे पुन्हा विचारणा सुरू केली. नंतर पोलिसांनी थेट राकेशला घेऊन त्याचं धायरीतलं घर गाठलं, तेव्हा राकेश आणि बबिता यांचा आठ वर्षाचा मुलगा घरी झोपलेला दिसला. पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता मुलाने थेट पोलिसांना वडिलांनीच आईला मारून टाकल्याचं सांगितलं. आई आणि वडिलांमध्ये जेवणाच्या कारणावरून आणि पैसे देण्याच्या कारणावरून कायम वाद व्हायचे, आज वाद विकोपाला गेले आणि त्यानंतर पप्पांनीच आईला गळा दाबून मारून टाकलं असं सांगितलं.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply