Pune : पुण्यात नवले ब्रिजवर भीषण अपघात, मर्सिडीजनं दुचाकीला उडवलं; घटनास्थळावरील फोटो पाहुन उडेल थरकाप | Pune Accident

Pune : पुण्यातील नवले ब्रिजवर एक भीषण अपघात घडला आहे. मर्सिडीज कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी एक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर कारचालकासह कारमधील चार जण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा कारचालकांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील नवले ब्रीजवर अपघातांची मालिका सुरूच असते. अशातच आणखी एक भीषण अपघात घडला आहे. नवले ब्रिजवर मर्सिडीज कारने दुचाकीस्वराला उडवले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर, एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. कुणाल हुशार (चिंचवड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृत आणि गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला रूग्णालयात नेण्यात आले.

अपघातानंतर कारचालकासह कारमधील चार जण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. विशेष म्हणजे, कारमधील चौघांची अद्यापही वैद्यकीय तपासणी झालेली नाही, त्यामुळे पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून दोघा कारचालकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आरोपींवर पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. गंभीर जखमी असलेल्या रूग्णावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply