Pune : पुणेकरांच्या कामाची बातमी, रिक्षाप्रमाणे आता कॅबमध्येही मीटर

Pune News: Cabs to Run on Meter Just Like Auto Rickshaws : पुणेकरांसाठी महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. आता रिक्षाप्रमाणेच कॅबमध्येही मीटर असेल अन् त्या प्रमाणेच भाडे आकारले जाईल. शुक्रवारी याबाबत भारतीय गिग कामगार मंचाच्या, IGF कॅब संघटनेद्वारे ठराव करण्यात आला. आरटीओने ठरवून दिलेल्या मीटरनेच प्रवाशांना घेतले जाईल. त्याशिवाय प्रत्येक कॅबमध्ये मीटर असेल, त्यानुसार प्रवासाचे भाडे आकारले जाईल, असा ठराव मंजूर झाला. शुक्रवारी भारतीय गिग कामगार मंचाच्या, IGF कॅब संघटनेद्वारे PWD मैदान,नवी सांगवी, पुणे येथे बहुमताने हा निर्णय घेण्यात आला. यावेळी ओला उबेर रॅपिडो वापरणारे कॅबचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय गिग कामगार मंच (IGF) कॅब संघटनेने पुणे येथे कॅब भाडे दरांसाठी मीटरचा वापर अनिवार्य करण्याचा ठराव मंजूर केला आहे. शुक्रवारपासून रॅपिडो कॅब चालक अॅपवरील प्रवाशांकडून मीटर प्रमाणेच भाडे घेतील. तसेच एक मे २०२५ पासून ओला आणि उबर वापरणाऱ्या प्रवाशांना सुद्धा मीटरने भाडे आकारण्यात येईल. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रवाशांना २५ रुपये प्रति किलोमीटर या RTO कॅब दरामध्ये 16 % डिस्काउंट देऊन प्रत्येक किलोमीटर दर 21 रुपये घेण्यात येईल, असा ठराव अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी मांडला व त्याला संघटनेच्या सभासदांनी एकमताने पाठिंबा दर्शविला.

Mumbai Water : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २४ तास पाणीपुरवठा बंद, पाहा कोणत्या भागांना बसणार फटका

www.onlymeter.in ने दिले कॅब चालकांना मीटर कॅब ला मीटर प्रमाणे दर घेण्यासाठी व रिक्षा मीटर चेक करण्यासाठी www.onlymeter.in या वेबसाईटचे संघटनेतर्फे अनावरण करण्यात आले. सदर वेबसाईट चा वापर करूनच कॅबचालक प्रवाशांकडून भाडे आकारणी करतील तसेच प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी कॅब मध्ये नोटीस चिटकवतील.रिक्षा मीटर बाबत प्रवाश्यांना शंका असल्यास ते सदर वेबसाईट वर जाऊन रिक्षा मीटर दर व्हेरिफाय करू शकतील.

कॅब मीटर दर (18 एप्रिल 2025 पासून लागू):

RTO निर्धारित दर: 25 रुपये प्रति किलोमीटर.

सवलत: 16% डिस्काउंट.

प्रवाशांकडून आकारला जाणारा दर: 21 रुपये प्रति किलोमीटर.

लागू असणारे ॲप्लिकेशन्स:

रॅपिडो: 18 एप्रिल 2025 पासून मीटरनुसार भाडे.

ओला आणि उबर: 1 मे 2025 पासून मीटरनुसार भाडे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply