Shocking News: जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकलं, आईने स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न केला; पण...

Pune : पुण्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीत एका रहिवासी भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. माहेरी आलेल्या एका विवाहित महिलेने आपल्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत दोन्ही बाळांचा मृत्यू झाला असून महिलेला वाचवण्यात यश आले आहे. थेऊर येथील दत्तनगर परिसरात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमरास ही धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा हेमंतकुमार मोहिते (३६ वर्षे) या महिलेने आपल्या दोन्ही मुलांची हत्या केली. प्रतिभा पुण्यातल्या थेऊर येथी दत्तनगरमध्ये राहत होती. मुलाना पाण्याच्या टाकीत टाकून त्यांची हत्या केल्यानंतर तिने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तिला वाचवण्यात आले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रतिभा मोहिते या महिलेला ताब्यात घेतले आहे.

Pune : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी गजाआड, बँकेचा संचालक फसवणुकीत सामील

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा मोहिते या आपल्या माहेरी थेऊर येथील आई-वडिलांकडे राहण्यासाठी आल्या होत्या. त्यांना आयव्हीएफद्वारे दोन महिन्यांपूर्वी जुळी मुले झाली होती. दोन्ही मुलं जन्माला आल्यापासून वारंवार आजारी पडत होती. त्यामुळे प्रतिभा मोहिते या सतत ताणतणावात आणि नैराश्याच्या छायेत असायच्या अशी माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी दिली.

वारंवार मुलं आजारी पडत असल्याने प्रतिभा यांनी आज टोकाचे पाऊल उचलले. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रतिभा मोहिते घराच्या टेरेस असलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीजवळ गेल्या आणि त्यांनी आपल्या दोन्ही जुळ्या मुलांना स्टूलवरती उभे राहून पाण्याच्या टाकीत टाकले त्यानंतर स्वतःही पाण्याच्या टाकीत उडी मारली.

दरम्यान, टाकीचे तोंड लहान असल्याने आणि पाणी जास्त असल्याने टाकीच्या आत प्रतिभा मोहिते या पाण्यात बुडाल्या नाहीत. दोन तीन वेळेस टाकीतून डोके वरती आल्याने समोर राहणाऱ्या एका व्यक्तीने टेरेसवरून ही घटना पाहिली आणि त्यांच्या घरी सदरची घटना कळवली.

मुलीच्या घरच्यांनी टेरेसवर जाऊन पाहणी केली असता दोन्ही मुले बुडालेल्या अवस्थेत आढळून आली. मुलांना नागरिकांच्या मदतीने वानवडी येथील कमांड हॉस्पिटल येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच प्रतिभा यांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply