Pune : अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यावरून महायुतीत वाद

Pune : अनाथ मुलीला शिक्षण देण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरून महायुतीतील शिवसेना (शिंदे) आणि अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’त वाद उफाळून आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचा उपाध्यक्ष शंतनू कुकडे याला बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. कुकडे याचा राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत वावर असतो. तो धर्मांतराचे रॅकेट चालवीत असून, त्याला परदेशातून पैसा मिळत असल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केलेले कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. मात्र, कुकडे याने पदाचा डिसेंबर महिन्यांतच राजीनामा दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केला आहे.

‘कुकडे याचा राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत वावर असतो. तो धर्मांतराचे रॅकेट चालवीत असून, त्याला परदेशातून पैसा मिळत आहे. याबाबत राज्य महिला आयोगालाही पत्र देण्यात आले आहे. पोलिसांकडून त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही,’ असा आरोप धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

250 Passengers Stranded in Turkey : लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं तुर्कीत लँडिंग, ४० तासांहून अधिक काळापासून २५० प्रवासी पडले अडकून

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, ‘कुकडे हा पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचा पदाधिकारी होता. मात्र, त्याने डिसेंबर महिन्यातच पक्षाचा राजीनामा दिला. त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. धंगेकर यांचेच कुकडे याच्याबरोबर संबंध होते. काही कारणाने त्यांच्यात वाद झाल्याने धंगेकर आता आरोप करत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे धंगेकर व्यथित झाले असून, त्यातूनच ते असे आरोप करून पक्षाची बदनामी करत आहेत.’

राज्य महिला आयोगाकडून दखल

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या घटनेची दखल घेतली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचा आदेश चाकणकर यांनी पोलिसांना दिला आहे. ‘अल्पवयीन मुलीची सुरक्षितता आणि समुपदेशनासाठी प्रशासनाला आदेश देण्यात आला आहे,’ असे चाकणकर यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply