Pune : ईएसआयसी एससी-एसटी असोसिएशन तर्फे ईएसआयसी रिक्रिएशन क्लब, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित "भीम जयंती 2025 – फेस्टिवल ऑफ फ्रेटरनिटी" चे भव्य उद्घाटन

Pune : पुणे, 21 मार्च 2025  रोजी ईएसआयसी, उप क्षेत्रीय कार्यालय, पुणे येथे "भीम जयंती 2025 – फेस्टिवल ऑफ फ्रेटरनिटी" या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संध्याकाळी 6 वाजता ईएसआयसी व्हॉलीबॉल ग्राउंड, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ईएसआयसीचे उप क्षेत्रीय कार्यालय, पुणे चे कार्यालय प्रमुख तथा संयुक्त संचालक श्री. सुकांता चंद्रा दास यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या उत्सवांतर्गत व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा तसेच लहान मुलांसाठी चित्रकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 21 मार्च ते 13 एप्रिल 2025 या कालावधीत पार पडणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविक करताना एससी-एसटी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव दूधमल यांनी सांगितले की,
बंधुता हा लोकशाहीचा मूळ गाभा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीमध्ये बंधुतेला विशेष स्थान दिले आहे. म्हणूनच या उत्सवाला 'फेस्टिवल ऑफ फ्रेटरनिटी' हे नाव देण्यात आले आहे.

Akola : अकोल्यात थरार... चुलत भावांचं जोरदार वाजलं, कुऱ्हाड अन् दगड, काठीणने मारहाण, एकाचा मृत्यू


अध्यक्षीय भाषणात श्री. सुकांता चंद्रा दास यांनी खेळांचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की,
खेळ आरोग्य सुधारतात, शारीरिक क्षमता वाढवतात आणि कार्यक्षमता विकसित करतात. 'भीम जयंती'च्या निमित्ताने आयोजित या स्पर्धा सहकार्य, एकता आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या आहेत. तसेच त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. वीरश्री पेटे यांनी केले, तर श्री. गोकुळ बेले यांनी आभार प्रदर्शन करताना सहभागी खेळाडू, क्रीडा समन्वयक आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
"भीम जयंती 2025 – फेस्टिवल ऑफ फ्रेटरनिटी" च्या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळत असून, हा महोत्सव केवळ क्रीडा स्पर्धांपुरता मर्यादित न राहता बंधुता आणि एकतेचे प्रतीक ठरत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply