Pune News : पुण्यातील शाळेचा मनमानी कारभार, शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

Pune : शहरातील एका प्रसिद्ध माध्यमिक शाळेत अंतर्गत मूल्यमापन आणि प्रमाणपत्र परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या गुणांची नोंद करण्यास संस्थाचालक आणि मुख्याध्यापिका जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा गुण ऑनलाईन भरायचे असतात. मात्र, संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत, निलंबित मुख्याध्यापिका सुरेखा सुतार आणि प्राथमिक मुख्याध्यापिका उल्का नवगिरे यांनी विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन भरण्यास नकार दिल्याने पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

फक्त तीन विषयांचे गुण भरले, इतर विषयांचे काय?

आतापर्यंत विज्ञान, गणित आणि मराठी या तीनच विषयांचे गुण ऑनलाईन भरले गेले आहेत. दराडे सर (विज्ञान), जाधव मॅडम (गणित) आणि जगताप मॅडम (मराठी) यांनी आवश्यक ती माहिती पूर्ण करून गुण नोंदवले आहेत. मात्र, उर्वरित विषयांचे गुण भरले न गेल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती पालक व्यक्त करत आहेत.

Fraud Case : गुंतवणूक करण्याचे सांगत कोट्यवधी रुपयांची फसवणूक; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

गुण ऑनलाइन न भरल्यास विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र परीक्षेवर परिणाम होऊ शकतो. अनेक विद्यार्थी भविष्यातील प्रवेश परीक्षांसाठी या गुणांवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत शाळेतील अनधिकृत शिक्षक आणि प्रशासनाने हा निर्णय जाणीवपूर्वक घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

शाळेवर कारवाई करण्याची मागणी

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पालकांनी शाळेत उपस्थित राहून बनसोडे सर, चौधरी सर, सुतार मॅडम आणि जेकटे मॅडम यांना जाब विचारावा असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्या शाळा प्रशासनाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी पालक व विद्यार्थी करत आहेत.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply