SPPU Admission 2025: पुणे विद्यापीठात प्रवेश परीक्षा अर्ज प्रक्रियेला सुरुवात, या तारखेपर्यंत मुदत

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सामाईक पात्रता परीक्षेची (Common Entrance Teste) घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ मार्च आहे. विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा कालावधी १८ ते २० मार्च दरम्यान असेल, तर पदवी अभ्यासक्रमासाठी ४ एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

पुण्यातील विद्यापीठाच्या मुख्य संकुलासोबतच नाशिक येथील उपकेंद्रातील अभ्यासक्रमाचाही या सामाईक पात्रता परीक्षेत समावेश आहे. पुणे विद्यापीठात ५२ विभाग असून, दरवर्षी शेकडो विद्यार्थी आहिल्यानगर, नाशिक, पुणे तसेच देशभरातील विविध भागांतून प्रवेशासाठी अर्ज करतात.

प्रवेश परीक्षेचे स्वरूप

एकूण गुण: १००

सामान्य ज्ञान व अभियोग्यता चाचणी: २० गुण

मुख्य विषयाचा पेपर: ८० गुण

चुकीच्या उत्तरासाठी दंड: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा

परीक्षेचा कालावधी: २ तास

परीक्षा पद्धती: ऑनलाइन

इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply