Pune : दिमाखदार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, देशी-विदेशी चित्रपटांची मेजवानी

Pune : चित्रपट महोत्सव हे चित्रपटांचा आणि कलाकरांचा गौरव करण्यासाठी असतात. यांच्या माध्यामातून आपण कलाकारांचा आणि त्यांच्या कलेचा सन्मान करतो. असाच एक सन्मान सोहळा पुण्यात पार पडणार आहे. पुणे शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. याच पुण्यात आज पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात होणार आहे. अनेक चित्रपटांना येथे सन्मानित करण्यात येणार आहे.

23 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (Pune International Film Festival) (पीफ) महोत्सवाचे उद्घाटन आज सायंकाळी पाच वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार  यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना पीएफ डिस्टिंग्विश अवॉर्ड, तर ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस.डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

Ganga River Water : गंगा नदीच्या पाण्यात शुद्ध होण्याची क्षमता, 12वर्षांपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणातून झाले सिद्ध

पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाची थीम ही शो मॅन: राज कपूर जन्मशताब्दी वर्ष आहे. यंदा प्रख्यात चर्मवाद्य वादन विजय चव्हाण आणि सहकारी यांच्या वादनाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होईल.

13 ते 20 फेब्रुवारी या महोत्सव कालावधीत आयोजित या चित्रपट महोत्सवात विविध देशी-विदेशी सुमारे 150 चित्रपट, जागतिक स्पर्धा विभागातील 14 आणि मराठी स्पर्धा विभागातील 7 चित्रपट दाखवले जाणार आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply