Pune News : खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत बोगदा, एप्रिल महिन्यापासून सुरू होणार काम; नेमके काय होणार फायदे?

Pune : पुण्यातील खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत करण्यात येणार्‍या बोगद्याचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. सध्या या बोगद्याचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली पर्यावरण मान्यता घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकाम आराखडा (व्हर्टिकल शाफ्ट आणि अ‍ॅक्सिस ऑडिट) स्थाननिश्चितीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा याचे कामकाज सुरू आहे. ही सर्व कामे खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत करण्यात येणार्‍या बोगदा या प्रकल्पामुळे 2.18 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. यातून सिंचनासाठी, तसेच बिगर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे सिंचनापासून वंचित राहणारे 3 हजार 471 हेक्टर इतके क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे. हा भूमिगत बोगदा सुमारे 34 किलोमीटरचा आहे. पर्यावरण मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

यासाठी काही भागांत भूसंपादनाचे काम सुरू आहे. बांधकाम आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. बोगद्यासाठी सुमारे 2 हजार कोटींचा खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी 2 हजार 190 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकल्पामुळे 2.18 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. यामुळे 3471 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहेत.

खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मुठा उजवा कालव्याच्या फुरसुंगी बोगदा प्रकल्पाला या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात मान्याता देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या बोगद्यामुळे पुणे परिसरास सिंचन आणि पिण्यासाठी अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे. खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मुठा उजवा कालव्याचा किलोमीटर 1 ते 34 लांबीचा भाग पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून जातो. पुणे शहराची होणारी वाढ, झोपडपट्टी, अतिक्रमणे व पर्यायाने होणारे जलप्रदूषण, जलनाश यामुळे कालव्याची हानी झाली आहे.

त्यामुळे कालव्याच्या वाहनक्षमतेत झालेली घट टाळण्यासाठी नवीन मुठा उजवा कालव्याच्या किलोमीटर 1 ते 34 मधील लांबीसाठी पर्यायी खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत बोगदा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 2.18 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. यातून सिंचनासाठी, तसेच बिगर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे सिंचनापासून वंचित राहणारे तीन हजार 471 हेक्टर इतके क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply