Pune : भीमथडी जत्रेत चोरी करणारे गजाआड

Pune  : भीमथडी जत्रेतील एका स्टाॅलमधून ७१ हजारांची रोकड चोरणाऱ्या चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.मनोज भगतसिंग पवार (वय ४१), संदीप संजय गौड (वय ३२), रतीलाल प्रेमलाल परमार (वय ५५), विकी राजू साळुंखे (वय ३५, चौघे रा. जामखेड, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला मूळची वाईजवळील आझर्डे गावच्या रहिवासी आहेत. गणेशखिंड रस्त्यावरील सिंचननगर येथील मैदानावर भीमथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले. तक्रारदार महिलेने भीमथडी जत्रेत विविध वस्तू विक्रीचा स्टाॅल लावला होता. रविवारी स्टाॅलच्या गल्ल्यातून ७१ हजार रुपयांची रोकड आरोपी पवार, गौड, परमार, साळुंखे यांनी चोरली. यापूर्वी कोथरुड भागातील एका महिलेच्या स्टाॅलमधील ७० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपींना पकडले. त्यांच्याकडून चोरीचे आणखी गुन्हे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply