Pune : बसमध्ये छेड काढणाऱ्या महिलेने शिकवला धडा; सपासप २५ चापटा मारल्या; पुण्यातील VIDEO व्हायरल

Pune : पुणे शहरासह राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. पुणे शहरात असे असताना एसटी बसमध्ये एका दारुड्या व्यक्तींने महिलेची छेडछाड होत असताना त्या महिलेने त्या व्यक्तीला चांगला चोप दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

पुणे येथे एसटी बस मध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर म्हणून कार्यरत असलेली एक महिला आपल्या पती आणि मुलासह प्रवास (Travel) करत होत्या. यावेळी मध्य धुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने त्यांची छेड काढली यावेळी त्या महिलेने रुद्रावतार धारण करत या व्यक्तीला चांगलाच चोप दिला.

महिलेने नंतर या व्यक्तीला शनिवारवाड्याच्या समोरच्या पोलीस चौकीत घेऊन गेले. परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता जवळजवळ अर्धा तास त्या महिलेने त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात डाबून ठेवले, त्या नंतर त्यांनी गरसेवकयांना संपर्क करत घडलेला प्रकार सांगितला त्या नंतर काही वेळाने पोलीस चौकीत आले.

व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,'': बस मध्ये छेड काढणाऱ्या मद्यधुंद प्रवाशाला प्रवासी महिलेने दिला चोप'',असे लिहिले आहे. तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी महिलेचे कौतुक केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply