Pune : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पत्ता दिलेल्या कंपनीवर पिंपरीच्या आयकर विभागाची कारवाई, कंपनी केली सील

Pune : तळवडे येथील खेडकर कुटुंबाशी संबंधित असलेली आणि पालिकेचा कर थकविल्याबद्दल वादग्रस्त कंपनी थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेडला महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने सील ठाेकले आहे. या कंपनी संचालकाकडे महापालिकेच्या दोन लाख ७७ हजार रुपयांच्या कराची थकबाकी आहे.

तळवडे गावठाण, ज्याेतिबानगर येथे थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेड ही कंपनी आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे. त्यामुळे कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कंपनी म. दि. खेडकर यांच्या नावे आहे. महापालिकेने यासंदर्भातली सर्व कागदपत्रे तपासली आहेत.

Jalna Accident : जालन्यात विहिरीत कोसळली जीप, 7 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

 

कंपनीमार्फत २००९ पासून व्यावसायिक कर भरला जात होता. शेवटचा कर २०२२ मध्ये भरण्यात आला. त्यानंतर कर भरला नाही. कंपनीने दोन लाख ७७ हजार ७८१ रुपयांचा कर थकविला आहे. त्यामुळे नियमानुसार मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने करण्यात आली. कारवाईवेळी प्रशासन अधिकारी नाना माेरे, एल. एम काळे संबंधित गटलिपिक, एमएसएफ जवान उपस्थित हाेते.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply