Pune : चार वेळा उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही अजित पवारांवर अन्याय कसा झाला?…शरद पवार यांचा सवाल

Pune : राज्याचे चारवेळा उपमुख्यमंत्री, अनेक वर्षे मंत्री आणि सगळी सत्ता त्यांच्याकडे असताना अन्याय कसा झाला, असा सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. आता युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी, पवार यांनी स्पष्ट केले.

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे शंभू सिंह हायस्कूल आणि कॉलेजमधील केंद्रात शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सदानंद सुळे, रेवती सुळे आणि विजय सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर पत्रकारांशी शरद पवार बोलत होते.

बारामती येथे झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी लिहिलेल्या पत्रात अजित पवार यांच्यावर अन्याय झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी पत्रकारांना विचारणा केली असता पवार म्हणाले, अजित पवारांवर कसला अन्याय झाला? चार वेळा उपमुख्यमंत्री पद, अनेक वर्षे मंत्री पद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला कसे म्हणता?

Pimpri : मावळमध्ये दुपारपर्यंत किती मतदान? मावळ ‘पॅटर्न’चे काय होणार?

मी काही ज्योतिषी नाही !

राज्यात महायुतीचे सरकार येणार असून, १७५ जागा मिळतील, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. त्याबाबत शरद पवार यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता, पवार म्हणाले,‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल. ते बहुमताचे सरकार असेल. नेमक्या जागा किती हे सांगायला मी ज्योतिषी नाही. अजित पवार यांच्या संख्येचा संदर्भ लक्षात घेता त्यांनी फक्त १७५ सांगितल्या २८० जागा सांगायला पाहिजे होत्या. अशी खिल्ली शरद पवार यांनी उडविली

गुन्हेगाराच्या म्हणण्याला काय अर्थ?

‘बिटकॉइन’प्रकरणाची सध्या चर्चा असताना, यावर शरद पवार म्हणाले, ‘जी व्यक्ती गुन्हेगार आहे. तुरुंगात होती त्या व्यक्तीच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? त्यावर बोलण्याची आवश्यकता आहे का?



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply