Pune : ”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!

Pune : लाडकी बहीण योजनेला नावे ठेवणारे, बहिणींना भीक देणारे सरकार अशी योजनेची हेटाळणी करणा-या महाविकास आघाडीने योजनेची वाढती लोकप्रियता लक्षात आल्यानंतर या योजनेचा जाहीरनाम्यात समावेश केला आहे. विरोधकांची ही योजना चोर महाआघाडी आहे, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे शुक्रवारी केली. महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री आहे,असेही शिंदे म्हणाले.

महायुतीच्या उमेदवार सिद्धार्थ शिरोळे, कसब्याचे उमेदवार हेमंत रासने, कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ गोखलेनगर येथे एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

महाविकास आघाडीने अडीच वर्षांत प्रकल्प, योजनांना स्थगिती दिली. त्यामुळे महाविकास आघाडीची विकास विरोधी सरकार म्हणून नोंद होईल. सत्तेच्या अडीच वर्षांच्या कालावधीत काय केले हे सांगण्यासाठी महाविकास आघाडीकडे काहीच नाही. त्यांनी काय केले हे समोर येऊन सांगावे असे आव्हानही शिंदे यांनी दिले.

Pune : मतदान दिनाच्या गमतीजमती !

लाडकी बहिण भाऊ, भावांबरोबरच शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी, आशा सेविका अशा सर्व घटकांसाठी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीपासून जनहिताचे निर्णय महायुतीने घेतले. अनेक योजनांचा निधी वाढविला. महायुतीच्या जाहीरनाम्याचा नवा दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला. लाडकी बहीण योजना लोकप्रिय होण्यास सुरूवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सावत्र भावांकडून झाला. बहीणींना भीक देताय का, अशी हेटाळणी करण्यात आली. सत्तेत आल्यानंतर योजनेची चौकशी केली जाईल. दोषींना तुरूंगात टाकले जाईल, असेही सांगितले. मात्र, एकनाथ शिंदे असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही. लाडक्या बहीण भावांसाठी शंभर वेळा तुरूंगात जाण्यासाठी तयारी आहे. मात्र, बहीणी सुज्ञ आहेत’, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, महायुतीचे सरकार देणारे आहे. घेणारे नाही. रेवड्यांचे सरकार अशी टीक सरकारवर झाली. मात्र, महायुतीच्या योजना महाविकास आघाडीने चोरल्या आणि त्याच समावेश जाहीरनाम्यात केला. तीन हजार रूपये देतो अशी घोषणा केली. कर्नाटक, हिमचल प्रदेश, राजस्थान सारख्या राज्यात काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे. आता ते केंद्र सरकारकडे बोट दाखवित आहेत. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यावर काय चमत्कार होतात हे सर्वांनी अडीच वर्षात पाहिले आहे. आता निवडणकीच्या कालावधीत खोटे राजकीय कथानक ( फेक नरेटिव्ह) पसरविण्याचा प्रयत्न केला जाईल. जाती जातीत तेढ निर्माञ करण्याचे, विद्वेष पसरवून राजकीय पोळी भाजली जाईल. त्यामुळे जागरूक राहून महाविकास आघाडीचे मनसुबे उधळून लावायचे आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply