Pune : दिवाळीतील हवा अन् ध्वनिप्रदूषणावर नजर! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष

Pune : दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे हवा प्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. या प्रदूषणावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बारकाईने लक्ष ठेवणार आहे. दिवाळीत ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दोन दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १२ ठिकाणी ध्वनिप्रदूषणाची नोंद करण्यात येणार आहे. याचवेळी सहा ठिकाणी हवा प्रदूषणाची नोंदी घेतल्या जाणार आहेत.

मागील काही काळापासून हवा प्रदूषणासोबतच ध्वनि प्रदूषणाची वाढ होत आहे. दोन्ही शहरांचा विस्तार सुरू असून, अनेक ठिकाणी बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे मोठी धूळ निर्माण होऊन हवा प्रदूषणात वाढ होत आहे. त्यातच वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानेही हवा प्रदूषणात भर पडत आहे. वाहनांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या आवाजानेही ध्वनिप्रदूषण वाढत आहे. याचबरोबर सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमात मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावण्यात येत असल्यानेही ध्वनिप्रदूषणात वाढ होत आहे.

Maharashtra : “मनसुख हिरेनची हत्या होणार हे माहिती होतं की नव्हतं?”; देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना प्रश्न; म्हणाले, “मी त्यावेळी…”

शहरातील हवा आणि ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे त्यात आणखी भर पडते. फटाक्यांच्या धुरामुळे हवेची पातळी विषारी बनते. याचवेळी त्यांच्या मोठ्या आवाजामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होता. सातत्याने मोठा आवाज कानावर पडल्याने बहिरेपणाचा धोका निर्माण होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिवाळीच्या काळात हवा आणि ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेतल्या जातात. या नोदींच्या आधारे शहरातील प्रदूषणाचा तुलनात्मक अभ्यास शक्य होतो.

ध्वनिप्रदूषण नोंदीची ठिकाणे
साखर संकुल (शिवाजीनगर)
नळ स्टॉप (कर्वे रस्ता)
सिटी प्राईड (सातारा रस्ता)
स्वारगेट
शासकीय मनोरुग्णालय (येरवडा)
खडकी बाजार
शनिवारवाडा
लक्ष्मी रस्ता
सारस बाग
औंध गाव
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता

दिवाळीच्या काळात प्रदूषणात मोठी वाढ होते. या प्रदूषणाच्या नोंदी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतल्या जाणार आहेत. या नोंदीच्या आधारे प्रदूषणाच्या पातळीत होणारी वाढ समजू शकेल. यानुसार त्यावर उपाययोजना करता येतील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply