Pune : सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार? फातिमानगर चौकातील सिग्नल बंद

Pune  : सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. सोलापूर रस्त्यावरील फातिमानगर चौकातील सिग्नल बंद करण्यात आला आहे. सिग्नल बंद केल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होईल, तसेच वाहतुकीचा वेगही वाढेल, असे वाहतूक विभागाने कळविले आहे.

वानवडी वाहतूक विभागाकडून प्रायोगिक तत्वावर फातिमानगर चौकात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार शिवरकर रस्त्याने हडपसरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी भैरोबानाला चौकाअगोदर वळावे (यू टर्न) घ्यावा. तेथून सोलापूर रस्त्याने जावे. या मार्गावरुन फक्त दुचाकी, तीन चाकी आणि मोटारींना प्रवेश देण्यात येणार आहे, तसेच सर्व प्रकारच्या बस, मालवाहू वाहनांनी भैरोबानाला चौकातील पेट्रोलपंपाला वळसा घालून सोलापूर रस्त्याकडे जावे.

Pune : मध्यरात्री नदीपात्रात पडलेल्या तरुणाला जीवदान; अग्निशमन दलाची कामगिरी

स्वारगेटकडून वानवडीतील शिवरकर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनाचालकांनी भैरोबानाला चौकात उजवीकडे वळावे. वानवडी बाजार पोलीस चौकीमार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.

स्वारगेटकडून भैराबानाला चौकातून वानवडीतील शिवरकर रस्त्याकडे जाणाऱ्या दुचाकी, तीनचाकी, मोटारचालकांनी फातिमानगरवरुन सरळ जावे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स प्रवेशद्वार क्रमांक दोन (अव्हेन्यु मॉलच्या अलीकडे) वळून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वानवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांनी केले आहे. या बदलामुळे काही प्रमाणात सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply