Pune News : वाजेवाडी परिसरात 'पुष्पा'चा थरार; चंदन चोरांच्या हल्ल्यात तिघे जखमी

Pune : शिरूर तालुक्याच्या वाजेवाडी परिसरात मागील दोन दिवसापासून चंदन चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. परिसरातील नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता चंदन चोरांकडून नागरिकांवर प्रतिहल्ला करण्यात आला. यामुळे तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पुण्याच्या (Pune) शिरूर तालुक्यात असलेल्या वाजेवाडी परिसरात चंदन चोरी केली जात आहे. परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर चंदन चोरी करण्यासाठी आलेल्या चंदन चोरांना स्थानिक नागरिकांनी विरोध केला. मात्र चंदन चोर चंदनाची लाकडे चोरी करण्यासाठी पूर्ण तयारीने आल्याने नागरिकांनी केलेल्या विरोधास न जुमानता नागरिकांवरच प्रतिहल्ला करण्यास सुरवात केली.

Maratha Reservation: शरद पवार म्हणाले आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करावी, जरांगे म्हणाले आधी का नाही सुचले?

यावेळी चंदन चोरांकडे असलेल्या गलोरीच्या माध्यमातून नागरिकांना दगड मारणात आले. यामध्ये दगड लागून तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये एक महिला, एक मुलगा व एका तरुणाचा समावेश आहे. या चंदन चोरामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलिसात (Police) तक्रार दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *