Pune : ‘एआय’ची अशीही कमाल! केवळ आवाजावरून बिल्डरला कळेल संभाव्य घर खरेदी करणारा ग्राहक

Pune : कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा वापर आता बांधकाम क्षेत्रातही सुरू झाला आहे. अगदी संभाव्य ग्राहक शोधण्यापासून ते घरांची त्रिमितीय रचना करण्यापर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. बांधकाम प्रकल्पासाठीची मंजुरी, कागदपत्रे यांचीही माहिती या माध्यमातून सहजपणे मिळू लागली आहे. ‘द चॅटर्जी ग्रुप’ने पुण्यासह महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांसाठी ‘सिरस.एआय’ या अॅप्लिकेशनच्या (उपयोजन) माध्यमातून या गोष्टी प्रत्यक्षात उतरवल्या आहेत.

कृत्रिम प्रज्ञेमुळे गृहखरेदीचा पूर्ण अनुभव बदलून जाणार आहे. घराची खरेदी ही जलद, अधिक प्रभावी पद्धतीने आणि सोयीस्कर होणार आहे. याबाबत ‘सिरस.एआय’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौविक बॅनर्जी म्हणाले की, बांधकाम क्षेत्रात परिपूर्ण सेवा देण्याच्या हेतूने आम्ही हे पाऊल उचलले आहे. यातून बांधकाम व्यावसायिकांना ग्राहक शोधण्यापासून ते घर ग्राहकांच्या ताब्यात देण्यापर्यंतच्या गोष्टी सहजपणे शक्य होतील. बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात चौकशी करणाऱ्या ग्राहकांच्या केवळ आवाजावरून कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान हे कोणता ग्राहक घर खरेदी करण्याची शक्यता जास्त याबाबत आडाखे बांधू शकते. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकाचा विक्री विभाग पुढील नियोजन करू शकते.

Sharad Pawar: विद्येचे माहेरघर 'कोयता गॅंग'; पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवरुन शरद पवारांची सरकारवर टीका



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply