
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एकास विशेष न्यायाधीश के.जहागीरदार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. छबी माेहन सोनी (वय २५, सध्या मूळ रा. उत्तरप्रदेश) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी सोनी तेरा वर्षीय मुलीच्या ओळखीचा होता. त्याने विश्वासाला तडा देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील ॲड. अरुंधती ब्रह्मे यांनी युक्तीवादात केली. या खटल्यात सरकार पक्षाकडून आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून आरोपी सोनीला न्यायालयाने जन्मठेप आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सोनी आणि पीडित मुलीची ओळख होती. घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने मुलीवर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. पीडित मुलगी गर्भवती झाली. त्यानंतर सोनीने मुलीला धमकावून वेळोवेळी बलात्कार केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने याबाबत हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हवेली पोलीस ठाण्यातील तत्कालिन पोलीसनिरीक्षक अशोक शेळके यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. न्यायालयीन कामकाजासाठी अधिकारी म्हणून सहायक फौजदार विद्याधर निचित यांनी काम पाहिले. हवालदार सचिन अडसूळ आणि किरण बरकाले यांनी सहाय्य केले.
राज्य सरकारने बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेला मदत देण्यासाठी मनोधैर्य योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत पीडित मुलीला दोन लाख रुपये किंवा नियमानुसार शक्य असेल त्यापेक्षा जास्त आर्थिक मदत करावी, अशा सूचना विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी दिल्या आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी



























Subscribe to my channel


