Pune : पेट्रोल पंपावरील रोकड लुटण्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड, चोरट्यांकडून पाच कोयते जप्त

Pune  :  महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या १२ जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून पाच कोयते, दुचाकी, मिरची पूड दोन लाख ५२ हजार १५० रुपयांचा माल जप्त केला आहे.

प्रथमेश ऊर्फ देवीदास कुडले (वय २३, रा. दत्तनगर), प्रकाश पाराजी काटे (वय २४, रा. दत्तनगर), करण संदीप चिकणे (वय २०, रा. सातववाडी, गोंधळेनगर, हडपसर), अजहर रमजान सय्यद (वय २३, रा. काशेवाडी, भवानी पेठ), सुशांत सुधाकर धोत्रे (वय १९, रा. संतोषनगर, कात्रज), आयाजन नियाज शेख (वय १९, रा. न्यू मोदीखाना, कॅम्प), रिहान रमजान सय्यद (वय २०, रा. काशेवाडी, भवानी पेठ), अरजान शाहीद शेख (वय १९, रा. नवीन नाना पेठ), फरहान सतीश येनपुरे (वय १९, रा. सारस सोसायटी, धनकवडी), दुर्गेश् हनुमंत सिद्धापुरे (वय १८, रा. फुरसुंगी, हडपसर), अंकीत राजू हकाळे (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Pune : पंतप्रधान अन्नदाता आर्थिक उत्पन्न संरक्षण योजनेला मंजुरी जाणून घ्या, ३५ हजार कोटी रुपयांची योजना कशी आहे

सर्व आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. मौजमजेसाठी पैसे पाहिजे असल्याने त्यांनी महामार्गावरील पेट्रोप पंपावरील रोकड लुटण्याचा कट रचला होता. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कदम, पोलीस कर्मचारी मंगेश पवार, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ,निलेश खैरमोडे, चेतन मोरे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले गस्त घालत होते. त्यावेळी शनीनगर चौकातील महादेव मंदिराजवळ असलेल्या एका पत्र्याच्या खोलीत काही जण जमले आहेत. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे असून, ते लूटमार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्यांना पकडले. त्यांच्याकडून पाच कोयते, पाच दुचाकी, मिरची पूड, दोरी असा मुद्देमाल जप्त केला.

चौकशीत पैशांची गरज असल्याने महामार्गावरील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती आरोपींनी दिली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply