Pune : भाज्या कडाडल्या, गौरी आगमनानिमित्त भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी

Pune : गौरी आगमनानिमित्त सर्व प्रकारच्या भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भाज्यांसह अंबाडी, आळूची पाने, शेपू, मेथी, कोथिंबीरचे दर तेजीत आहेत. गौरीचे आगमन मंगळवारी झाले. घरोघरी विधीवत पूजन करण्यात आले. बुधवारी गौरी पूजन असून, भाज्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. महात्मा फुले मंडई, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरात सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. गौरीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी लागणाऱ्या अंबाडी, आळूची पाने, शेपू, मेथी या पालेभाज्यांच्या मागणीत वाढ झाली. नैवेद्यासाठी लागणाऱ्या पालेभाज्यांच्या जुडीचे दर ४० ते ६० रुपयांपर्यंत आहेत. आळूच्या पानांचे दर २० ते २५ रुपये आहेत. कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर ७० ते ८० रुपयांपर्यंत आहेत. पडवळचे किलोचे दर १०० ते १२० रुपये आहेत. गौरी आगमनानिमित्त भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, बहुतांश भाज्यांचे किलोचे दर शंभर रुपयांच्या पुढे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाज्यांचे दर तेजीत असल्याची माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी दिली.

बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे भाज्या, पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. भाज्यांच्या प्रतवारीवरही परिणाम झाला. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या भाज्यांचे दर तेजीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Hinjewadi IT Park : जबाबदारीची अशी ही ढकलाढकली! वाहतूक कोंडीबाबत चार सरकारी यंत्रणांचे एकमेकांकडे बोट



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply