Pune : पुणेकरांसाठी मोठी बातमी! गणेशोत्सवानिमित्त तीन दिवस वाहतुकीत बदल, कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते?

Pune  : गणेश प्राणप्रतिष्ठा आणि मूर्ती खरेदीच्या निमित्ताने शहरातील मध्यवस्तीमध्ये तीन दिवस वाहतूक बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस अमोल झेंडे यांनी केले आहे.गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल मोठ्या संख्येने डेंगळे पूल ते शिवाजी पूल, श्रमिक भवनसमोर (अण्णा भाऊ साठे चौक) व कसबा पेठ पोलिस चौकी ते जिजामाता चौक; तसेच मंडई आणि सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड) या भागांत आहेत. त्यामुळे या भागांतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पाच ते सात सप्टेंबर दरम्यान सकाळी सहा ते रात्री १२ दरम्यान हा वाहतूक बदल असणार आहे.

सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. या भागात वाहनचालकांनी वाहने लावू नयेत. मुंढव्यातील केशवनगर भागात मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन या भागात वाहतूक बदल करण्यात आला आहे.

शिवाजी रोड-गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक (मंडई) परिसर वाहतुकीसाठी बंद असणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue : ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक


- पर्यायी मार्ग : गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
- शिवाजीनगर येथून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
- झाशी राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पूल मार्गे कुंभार वेशीकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी खुडे चौकातून मनपासमोरून मंगला चित्रपट गल्लीतून कुंभार वेस किंवा प्रीमियर गॅरेज चौक शिवाजी पूल मार्गे, गाडगीळ पुतळा चौक, डावीकडे वळून कुंभार वेस चौक.

वाहतुकीस खुले रस्ते
- फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक

- अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
- मंगला चित्रपटगृहसमोरील प्रीमिअर गॅरेज गल्ली ते कुंभार वेस

वाहने लावण्यासाठी व्यवस्था
- न्या. रानडे पथावर कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा चौक दरम्यान एका बाजूला वाहने लावण्यास परवानगी
- वीर संताजी घोरपडे पथावरील महापालिका वीजभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौकदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावण्यास परवानगी
- टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नदीपात्रातील रस्त्यावर वाहने लावण्या परवानगी
- मंडईतील मिनर्व्हा आणि आर्यन वाहनतळ येथे वाहने लावता येतील.
- शाहू चौक (फडगेट पोलिस चौकी) ते राष्ट्रभूषण चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावता येणार आहेत.

पीएमपी मार्गात बदल
शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गात बदल केला आहे. स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्तामार्गे बस जातील. महापालिकेकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply