Pune : 'फडणवीसांच्या जवळचे लोक मला गुपचूप भेटतात;..तर मी सगळं उघड करणार', जरांगेंचा पुन्हा इशारा

Pune :  मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ’ निवडणूक लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली. पण निर्णय कोणताही झाला नाही. पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की 288 पाडायचे’ असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

‘समाज पुढे चालला आहे, आम्ही रणणिती उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस डाव करतील. नेते आंतरवलीत येऊन फुकट चहा पिऊन जातात. पण मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. फडणवीसांच्या जवळचे येऊन मला गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन. दहशतीने निवडणूक जिंकता येत नाही, तर मायेनं जिंकता येते. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय सरकारमधील पानही हालत नाही.‌ मुख्यमंत्री कोणीही असो निर्णय फडणवीसच घेतात’ असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Pune : पुण्यातून सुटणाऱ्या एक्स्प्रेसबाबत महत्त्वाचा निर्णय; पुणेकरांच्या मागणीची दखल !

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,’ फडणवीसांमुळे सगे सोयरेचा निर्णय होत नाही. देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाही, पण मराठा द्वेषी आहेत. आठदहा दिवसांपूर्वी भाजपचे आठ दहा आमदार माझ्याकडे आले त्यांनां म्हटलं देवेंद्र फडणवीस यांना जाऊन सांगा आरक्षण द्यायला. ते गेले सागर बंगल्यावर आणि परत आलेच नाहीत. देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर जादू करतात,’ अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply