Pune Firing : महिनाभरापूर्वीच रचला होता हत्येचा कट, आंदेकरांना का संपवलं? पोलीस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर

Pune : पुणे पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे, राष्ट्रवादीचे  माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आंदेकर यांच्यावर गोळीबार केला. आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आंदेकर यांची हत्या ही कौटुंबीक वादातून झाल्याचं समोर आलं आहे. मात्र आता पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आंदेकर टोळीची पुण्यात मोठी दहशत आहे. त्यामुळे वनराज आंदेकर यांची हत्या टोळीचा बॅकबोन म्हणून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एक महिन्यापूर्वीच वनराज आंदेकरांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.  सोमनाथ गायकवाड याने आंदेकर यांच्या हत्येचा कट रचला आरोपी सोमनाथ गायकवाड याची याच भागात टोळी असल्याने आंदेकर आणि गायकवाड यांच्या वादातून बदला घेण्याच्या हेतूने ही हत्या झल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Pune : पाऊस दमदार, तरी पाणीपुरवठा बंद! पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा

घरगुती वाद आणि टोळी युद्ध यामुळेच वनराज आंदेकरांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  त्यामुळे पुण्यात आता पुन्हा एकदा टोळी युद्ध सुरू होते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणात काही आरोपींना अटक केली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply