महावितरणचे तारा अन् खराब खांबाकडे दुर्लक्ष

कोळवण, ता. १८० भालगुडी-काशिग मुख्य वीजवाहिनीचा खांब शेतकरी बाळू जिवाजी साठे यांच्या घराशेजारी आहे. तो पूर्णपणे गंज लागला असून संपूर्ण खांबास छिद्र पडली आहेत. या खांबाला हात लावला तरी क्षणात कोसळेल, अशी अवस्था आहे. या ठिकाणी नव्याने पंधरा खांबाची आवश्यकता आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रस्ताव देवून महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप भालगुडीतील ग्रामस्थांनी केला.

•रल

पावसाळा तोंडावर आहे, खरिपातील शेतीची कामे जोरात सूरू आहे, अशातच हे गंज लागलेले खांब कोसळून अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? खरंतर अपघात होण्यापूर्वीच उपाययोजना करायला हव्यात महावितरणने या कामासाठी आतातरी तत्परता दाखवावी.

Pune News : वारजे ते कोंढवे-कोपरे रस्त्यावर ठिकठिकाणी साचते पाणी; वाहतूक ठप्प, उपाययोजनेची मागणी

• रत्ना

महावितरणचे 'एक गाव एक दिवस' अभियान सुरू होते. मग, या अभियानात ही कामे का केली गेली नाहीत? मावळमधील तुंग येथील फिडरमधून काशिमपर्यंत नव्याने वीज खांब व वीजवाहक तारा जोडणीचे काय झाले? हे काम झाले असते तर, भरे येथील फिडरमध्ये बिघाड झाल्यास तुंग येथील फिडरमधून पर्यायी वीजपुरवठा करता येईल? अशी व्यवस्था आहे. महावितरणने कामाचे वीस खांबाचे अंदाजपत्रक देखील सात ते आठ महिन्यापूर्वीच बनविले. परंतु, त्याचे पुढे काय झाले हे माहीत नाही.
महावितरणकडून भालगुडी-काशिग येथील मुख्य वीजवाहक तारा, खराब झालेले खांब पावसाळ्याच्या पूर्वी बदलण्यात यावेत. आम्ही याबाबत मागील पाच वर्षांपासून आवाज उठवत आहोत. परंतु, महावितरण हे काम करण्यास टाळाटाळ करीत आहे.भालगुडी-काशिग येथील मुख्य वीजवाहक तार व खराब झालेले खांब लवकरच बदलून घेण्यात येणार आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply