
Pune : यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणे तुडुंब भरलेली असतानाही पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल एक लाख ६७ हजार नागरिक अद्यापही तहानलेलेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नागरिकांना ६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने काही तालुक्यांमध्ये सुरू झालेले टँकर अद्याप सुरू असल्याचे समोर येत आहे.
सर्वार्थाने सधन अशी ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे तीव्र उन्हाच्या झळांमुळे अनेक ठिकाणी पिके वाळली होती. सिंचनाची सोय असलेल्या भागातही पाण्याअभावी पिकांनी मान टाकली होती. परिणामी चारा उपलब्धतेवरदेखील परिणाम झाला होता. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर वगळता इतर चारही जिल्ह्यांतील नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसली होती. विहिरींनी तळ गाठल्याने पाऊस कमी झालेल्या तालुक्यांत जनावरांच्या चाऱ्या-पाण्याची टंचाई जाणवत होती.
मात्र, यंदा मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील बहुतांश धरणे भरली आहेत.
|
|
कृष्णा खोऱ्यातील सर्व धरणांत ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. भीमा खोऱ्यातील धरणे सुमारे ७० टक्के भरली आहेत. सर्वदूर पाऊस झाल्याने पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याची चिंता मिटली असल्याचे चित्र आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही पुणे जिल्ह्यातील एक गाव, साताऱ्यातील दहा गावे, सांगलीतील ३६ आणि सोलापूर जिल्ह्यातील सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकूण ६९ टँकरपैकी २३ शासकीय, तर ४६ खासगी टँकरचा समावेश आहे. सर्वाधिक झळ सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत बसत आहे.
या पाणीटंचाईतून जनावरे देखील सुटलेली नाहीत. पुणे जिल्ह्यात २३२, सांगली २७ हजार ४२९, सोलापूर ५३९० असे एकूण ३३ हजार ५१ पशुधन बाधित असल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.
५३ गावांना टँकरने पाणीपुरवठा
जिल्हा – टँकर संख्या
पुणे – १
सातारा – १०
सांगली – ४३
सोलापूर – १५
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


