Pune : शहरातील खड्डे दुरुस्ती जीवघेणी; बुजविलेल्या खड्ड्यांमधील खडी रस्त्यांवर पसरल्याने अपघातांचा धोका

Pune : शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर खड्डे दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला असला तरी, ऐन पावसाळ्यात केलेली अशास्त्रीय पद्धतीच्या दुरुस्तीमुळे बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांमधील बारीक खडी रस्त्यावर पसरण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांतच पुन्हा रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे खड्डे दुरुस्ती जीवघेणी ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून खड्डे दुरुस्तीसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्चही पाण्यात गेला आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपर्यंत सुरू असलेल्या जोरदार पावसाने रस्त्यांची दुरवस्था होऊन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे ऐन पावसाळ्यातच महापालिकेच्या पथ विभागाकडून खड्डे दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली.

Pune : दारुसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून गुंडाचा खून, रामटेकडी परिसरातील घटना

खड्डे बुजविण्याचे काम रात्रीही चालू ठेवत अनेक लहान मोठे खड्डे भरण्यात आले. मात्र या खड्डे दुरुस्ती तात्पुरती मलमपट्टी ठरल्याचे पुढे आले आहे.खड्डे दुरुस्ती करताना बारीक खडीचा वापर करण्यात आला आहे. मात्र घाईगडबडीत आणि अशास्त्रीय पद्धतीने खड्डे दुरुस्ती करण्यात आल्याने खडी रस्त्यावर येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply