Pune  : पुढची निवडणूक आली, तरी मागच्या निवडणुकीतील मतदान यंत्रे गोदामातच सीलबंद! मावळ मतदारसंघातील स्थिती; हे आहे कारण…

Pune  : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी एक असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्या खासदारकीवर आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबत एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरण्यात आलेली मतदान यंत्रे भोसरी येथील गोदामात मोहोरबंद करून ठेवण्यात आली आहेत. या याचिकेवर निकाल लागत नाही, तोवर ही यंत्रे तशीच ठेवावी लागणार आहेत.


पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ हे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून सन २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुक्रमे भाजपचे मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले आहेत. पुण्यातून ३५, तर बारामतीतून ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शिरूर आणि मावळमधून अनुक्रमे ३२ आणि ३३ उमेदवार निवडणुकीला उभे होते.

Pune : पुण्यातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा

मतमोजणीनंतर निकालावर ४५ दिवसांत आक्षेप आल्यास निवडणूक आयोग किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित मतदान यंत्रे तशीच ठेवली जातात आणि उर्वरित यंत्रांमधील विदा (डाटा) नष्ट करून ती निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली जातात. या चारपैकी केवळ मावळ मतदारसंघातील निवडणूक निकालाविरोधात विविध कारणे देत मुंबई उच्च न्यायालयात राजू पाटील नामक व्यक्तीने याचिका दाखल केली आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेकडून मावळ मतदारसंघात वापरण्यात आलेली यंत्रे भोसरी येथील गोदामात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. न्यायालयीन कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पाटील यांना न्यायालयाने दीड महिन्याची मुदत दिली आहे.

सील केलेल्या मतदान यंत्रांचा आढावा

मतदारसंघ बीयू- सीयू -व्हीव्हीपॅट

मावळ ९२३६ -३५९१ -३८१६



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply