Pune : कसब्याचं राजकारण तापलं! धंगेकरांविरोधात भाजप आक्रमक; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

Kasaba by Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची वेळ संपली असली तरी राजकीय घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीत. या पोटनिवडणुकीत भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांसमोर पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला होता.

याच आरोपांवरुन त्यांनी आज कसबा गणपतीसमोर उपोषण पुकारले. अखेर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. पण त्यांच्या या उपोषणानंतर भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. 

धंगेकरांकडून आचार संहितेचा भंग..

भाजपचं शिष्टमंडळ पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला आले. या शिष्टमंडळाने रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराची वेळ संपलेली असताना खोटे आरोप करत आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार केला. याशिवाय त्यांनी आचारसंहितेचा भंग केला, अशी तक्रारही भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

महाविकास आघाडीकडून होणार बोगस मतदान?

तसेच कसब्यामध्ये बोगस मतदान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या उमेदवारामार्फत सुरु आहे. जिथे बोगस मतदानाची तयारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केलेली आहे. त्याठिकाणी अधिकचा पोलीस बंदोबस्त लावला पाहिजे. तिथे कुठल्याही पद्धतीत बोगस मतदान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असेही भाजप नेत्यांनी सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply