Pune : इंदापुर तालुक्यात बॉंम्ब सदृश्य वस्तू आढळ्याने खळबळ; स्फोटाच्या सहाय्याने केला नाश

Pune News : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील टणू गावात एका शेतकऱ्याला आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर आज सकाळी संपूर्ण तपास करून पुणे शहर बीडीडीएसच्या पथकाच्या त्या संशयास्पद वस्तूचा स्फोटाच्या साहाय्याने नाश केला आहे. 

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, काल दत्तात्रय मोहिते यांच्या गोठ्यात बॉम्ब सदृश वस्तू सापडली होती. त्यानंतर परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं. मोहिते यांनी तत्काळ इंदापूर पोलिसांना याबाबतची कल्पना दिली होती. त्यानंतर इंदापूर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली.

त्यानंतर इंदापूर पोलिसांनी पुणे ग्रामीणचे बीडीडीएस पथकशी संपर्क करून पथकाला पाचारण केले. काल संध्याकाळी पथक टणू गावात दाखल झाले होते. त्यानंतर आज सकाळी संपूर्ण तपास करून पुणे शहर बीडीडीएसच्या पथकाच्या मदतीने त्या संशयास्पद वस्तू निकामी केली आहे.

दरम्यान, ही वस्तू निकामी करण्यात आली असली तरी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित वस्तू या ठिकाणी कशी आली? हा नेमका बॉम्ब होता की आणखी काही? यात दारू होती का? यात कोणते पदार्थ होते याचा तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

इंदापूर तालुक्यात 121 टीएमसी क्षमतेचे उजनी धरण आहे अशा ठिकाणी अशा गोष्ट सापडणं ही खरंच चिंतेची बाब आहे. पोलीस या सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होत हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply