Pune : पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी; पोलीस यंत्रणा सतर्क

Pune : पुण्यातील कोरेगाव पार्कात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा खोटा कॉल आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील गुगल ऑफिसमध्ये बॉम्ब असल्याचा खोटा कॉल आला होता. या खोट्या कॉलमुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. खोटा कॉल आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची माहिती घेतली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये हे गुगलचे ऑफिस आहे. कोरेगाव पार्क येथील पूनावाला बिल्डिंगमध्ये हे गुगलचे ऑफिस आहे.

मुंबईतील गुगल ऑफिस मध्ये पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देऊ, असा धमकीचा निनावी कॉल करण्यात आला होता. या खोट्या कॉलनंतर बॉम्ब शोधक पथकाकडून काल रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली.

यावेळी कुठली ही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही. पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता. त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्रथामिक माहिती समोर आली आहे .

बॉम्ब स्फोटांच्या धमक्यांच्या दूरध्वनींच सत्र सुरूच

राज्यात बॉम्ब स्फोटांच्या धमक्यांचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. काही तासांच्या अंतरात आलेल्या बॉम्ब स्फोट धमकीच्या दोन फोन कॉल नंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.

सोमवारी पहाटे मुंबई वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त, प्रविण पडवळ यांना यशवंत मने नावाच्या इसमाने सतत फोन करून मिरा भाईंदर परिसरात बॉम्ब स्फोट होणार असून पोलीस मदतीची मागणी केली. अधिक विचारणा केली असता त्या इसमाने शिवीगाळ केली. पोलिसांनी या प्रकरणी आणखी तपास सुरू केला आहे.

शनिवारी रात्री गुगल इंडियाच्या वांद्रे कुर्ला संकुलातील कार्यालयात धकमीचा फोन आला होता. गुगल इंडियाच्या पुणे येथील कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. स्वतःच नाव पणयम बाबू शिवानंद सांगून हैदराबाद येथून बोलत असल्याचे सांगितले होते. कंपनीच्या लँडलाईनवर फोन करून धमकी दिली होती.

बीकेसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी भा दं वि ५०५(१)(ब) आणि ५०६(२) कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. हैदराबादचं लोकेशन ट्रेस होताच पोलीस पथक हैदराबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply