सिंहगड : खडकवासला धरणाच्या पाण्यात एनडीए-बहुली रस्त्यावरील कुडजे गावच्या हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. संबंधित व्यक्तीचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे असावे असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवला असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पीएमआरडीए च्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राला खडकवासला धरणाच्या पाण्यावर कुडजे गावच्या हद्दीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती पुणे शहर अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून मिळाली. पीएमआरडीए चे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल रोकडे, किशोर काळभोर, श्रीकांत आढाव,
सूरज इंगवले व विशाल घोडे या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू केली. ज्या ठिकाणी मृतदेह तरंगत होता त्या ठिकाणी उतरणे अवघड असल्याने नौदलाच्या बोटीने अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाजवळ पोहोचले व मृतदेह पाण्याबाहेर काढला.
उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या सूचनेनुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून याबाबत पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिली आहे.
मृतदेह वाहत आला असावा....... ज्या ठिकाणी मृतदेह आढळला तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता तेथे उतरणे शक्य नसल्याने व तेथे संबंधित व्यक्तीचे कपडे किंवा इतर वस्तू दिसून न आल्याने मृतदेह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील इतर ठिकाणाहून वाहत येऊन येथे खडकाजवळ अडकला असावा असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवला आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत असून मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
शहर
- Pune CNG Price Hike : वाहनधारकांना महागाईचा झटका; सलग दुसऱ्या दिवशी CNG दरात वाढ, जाणून घ्या नवी किंमत
- Pune News : पाळीव कुत्रीला खाण्याचं आमिष, पुण्यात तरुणाकडून श्वानावर अनैसर्गिक कृत्य; संतापजनक प्रकार CCTV मध्ये कैद
- Kalyan : शाळेच्या ताब्यासाठी दोन संस्थांमध्ये तुफान राडा, व्यवस्थापक व शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला, लाकडी दांडक्याने मारहाण
- Dombivali : डोंबिवली पश्चिमेत रिक्षा बंद! वाहतूक पोलीस रिक्षाचालकांचा वाद चिघळला
महाराष्ट्र
- Devendra Fadnavis : अमित शाह शिवरायांचे सेवक, मराठा इतिहासाचे संशोधक - देवेंद्र फडणवीस
- Karad Gang : 'या' ४ धारदार हत्याराने संतोष देशमुखांचा जीव घेतला, 'कराड गँगकडून' खास हत्यारं तयार, १५० वार करून देशमुखांना काळं निळं केलं अन्..
- SSC-HSC Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! पुणे बोर्डाने केली मोठी घोषणा
- Hanuman Jayanti : संगमनेरमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत राडा; आमदार, पोलिसांसमोर आयोजक-वादक भिडले
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- 250 Passengers Stranded in Turkey : लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं तुर्कीत लँडिंग, ४० तासांहून अधिक काळापासून २५० प्रवासी पडले अडकून
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे