Pulwama Attack : जरा याद करो कुर्बानी...! पुलवामा हल्ल्याला सहा वर्ष पूर्ण, १४ फेब्रुवारी रोजी नेमकं काय घडलं होतं?

Pulwama Attack : १४ फेब्रवारी २०१९ ही तारीख कोणताही भारतीय नागरिक विसरू शकत नाही. याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय निमलष्करी दलाचे ४० जवान शहीद झाले होते. आज या घटनेला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, या हल्ल्याच्या जखमा आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत.

कसा झाला होता हल्ला ?

१४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांचा ताफा जम्मूपासून श्रीनगरच्या दिशेने निघाला होता. या ताफ्यात ६० हून अधिक वाहने होती. या वाहनांमध्ये २५४७ सैनिक होते. यादरम्यान अचानक एक स्फोटकांनी भरलेली लाल गाडी ताफ्याच्या बाजुने जाऊ लागली. सैनिकांनी त्या गाडीला ताफ्यापासून दूर जाण्यास सांगितल. मात्र, चालकाने या सुचनेकडे दुर्लक्ष केलं. अवंतीपुरा भागात पोहोचताच त्या गाडीने सैन्याच्या ताफ्यातील एका गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात भारतीय निमलष्करी दलाचे ४० जवान शहीद झाले.

जैश-ए-मोहम्मदने घेतली जबाबदारी

या घटनेनंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबादारी घेतली. या हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली. प्रत्येक भारतीयाच्या मनात पाकिस्तानला धडा शिकवावा ही एकच भावना होती. पंतप्रधान मोदी यांनीही यासंदर्भात बोलताना, ज्या भावना देशवासियांच्या आहेत, त्याच भावना माझ्या आहेत, असं म्हणत सूचक इशारा दिला होता.

Pune Metro construction : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! मेट्रोवरच डोळा; अडीच लाखांचं साहित्य लंपास

भारताचे प्रत्युत्तर

या हल्ल्याच्या १२ दिवसांनंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. २६ फेब्रुवारी रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे हवाई हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतनाद्यांचा खात्मा करण्यात आला.

विंग कमांडर अभिनंदन यांची शौर्यगाथा

या हवाई हल्ल्यादरम्यान भारताच्या मिग-२१ विमानांनी पाकिस्तानच्या एफ-१६ लढाऊ विमानांचाही सामना केला. मात्र, यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-२१ हे लढाऊ विमान क्षतीग्रस्त झाले आणि थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन कोसळले. काही तासातच विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तान पोलिसांनी कैद केलं. मात्र राजनैतिक दबावामुळे पाकिस्तानला १ मार्च २०१९ रोजी अभिनंदन यांना सोडावं लागलं. पुढे विंग कमांडर अभिनंदन यांना 'वीर चक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply