President's Police Medal : अभिमानास्पद! देशभरातील ९०१ पोलिसांना पदके जाहीर; राज्यात 'या' पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

President's Police Medal : पोलीस सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ९०१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस पदके जाहीर झाली आहेत. यात १४० जणांना शौर्य पोलीस पदक (पीएमजी), ९३ जणांना अतिविशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक (पीपीएम) आणि ६६८ जणांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदक (पीएम) देऊन गौरविले जाणार आहे.

गुन्हेगारी रोखताना, अपराध्यांना पकडताना दाखविलेल्या शौर्याबद्दल पोलिस शौर्यपदक दिले जाते. तर पोलीस सेवेदरम्यान विशेष कार्यामधील सहभागाच्या आधारे राष्ट्रपतींचे पोलिस पदक प्रदान केले जाते. कर्तव्य, सेवेतील निष्ठा या गुणांच्या आधारे उल्लेखनीय सेवेसाठी पोलिस पदक देण्यात येते.

याअंतर्गत महाराष्ट्रातील ३१ अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्यपदक, ४ जणांना अतिविशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलिस पदक तर ३९ जणांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलिस पदक देण्यात येणार आहे.

अतिविशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलिस पदक

१. देवेन त्रिपुरारी भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक, स्टेट सिक्युरिटी को-ऑपरेशन, मुंबई, महाराष्ट्र

२. अनुप कुमार सिंह, अतिरिक्त पोलिस महासंचालक, मुंबई 

३. संभाजी नारायण देशमुख, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी (पोलीस उपनिरीक्षक), मुंबई

४. दीपक धनाजी जाधव, पोलीस उपनिरीक्षक, ठाणे

पोलिस शौर्य पदक

१. मनीष कलवानिया, आयपीएस, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

२. संदीप पुंजा मंडलिक, सहाय्यक पोलिस निरिक्षक

३. राहुल बाळासो नमादे सहाय्यक पोलिस निरीक्षक

४. सुनील विश्वास बागल, पोलिस उप निरिक्षक

५. देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम, एनपीसी

६. गणेश शंकर डोहे, पोलिस कॉन्स्टेबल

७. एकनाथ बारीकराव सिदारन, पोलिस कॉन्स्टेबल

८. प्रकाश श्रीरंग नरोटे, पोलिस कॉन्स्टेबल

९. दिनेश पांडुरंग गावडे, पोलिस कॉन्स्टेबल

१०. शंकर दसरू पुंगती, पोलिस कॉन्स्टेबल

११. योगीराज रामदास जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक

१२. अमोल नानासाहेब फडतरे, सहाय्यक पोलिस निरिक्षक

१३. सदाशिव नामदेव देशमुख, पोलिस उप निरिक्षक

१४. प्रेमकुमार लहू दांडेकर, पोलिस उप निरिक्षक

१५. राहुल विठ्ठल आव्हाड, पोलिस उप निरिक्षक

१६. देवाजी कोतुजी कोवासे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक

१७. राजेंद्र अंताराम मडावी, हेडकॉन्स्टेबल

१८. नांगसू पंजामी उसेंडी, एनपीसी

१९. देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम, एनपीसी

२०. प्रदिप विनायक भासरकर, एनपीसी

२१. सुधाकर मनु कोवाची, पोलिस कॉन्स्टेबल

२२. नंदेश्वर सोमा मडावी, पोलिस कॉन्स्टेबल

२३. सुभाष भजनराव पाडा, पोलिस कॉन्स्टेबल

२४. भाऊजी रघु मडावी, पोलिस कॉन्स्टेबल

२५. शिवाजी मोडू उसेंडी, पोलिस कॉन्स्टेबल

२६. गंगाधर केरबा कराड, पोलिस कॉन्स्टेबल

२७. रामा मैनु कोवाची, पोलिस कॉन्स्टेबल

२८. महेश पोचम मधेशी, पोलिस कॉन्स्टेबल

२९. स्वप्निल केसरी पाडा, पोलिस कॉन्स्टेबल

३०. तानाजी दिगंबर सावंत, पोलिस निरिक्षक

३१. नामदेव महिपती यादव, पोलिस हवालदार

उल्लेखनीय सेवेसाठी पोलिस पदक

१. जयकुमार सुसाईराज, विशेष महानिरिक्षक (स्पेशल आयजीपी) कोलावा, मुंबई,

२. लखमी कृष्ण गौतम, एस.पी. आयजीपी, कोलावा, मुंबई

३ निशिथ वीरेंद्र मिश्रा, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपाडा, मुंबई

४ संतोष गणपतराव गायके, उप. पोलीस अधीक्षक गोरेगाव, मुंबई

५. चंद्रकांत विठ्ठल मकर, एसीपी, दादर (पूर्व) मुंबई

६. दीपक राजाराम चव्हाण, पोलिस निरीक्षक, माटुंगा (पूर्व) मुंबई

७. रमेश विठ्ठलराव काठार, पीडब्ल्यूआय (इंजी.), औरंगाबाद रेंज

८. देविदास काशिनाथ घेवारे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक (वन स्टेप प्रमोशन), एसीबी अमरावती

९. सुधाकर पंडितराव काटे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक (वन स्टेप), सीआयडी पुणे

१०. शैलेश दिगंबर पासलवाड, सहायक पोलिस आयुक्त, नवी मुंबई

११. मनोज श्रीकांत नेर्लेकर, पोलिस उपअधीक्षक (वन स्टेप), वरळी, मुंबई

१२. शाम खंडेराव शिंदे, पोलीस निरीक्षक, नवी मुंबई

१३. अलका सदाशिव देशमुख, पोलीस निरीक्षक, ठाणे शहर

१४. दत्तात्रय भगवंतराव पाबळे, पोलीस निरीक्षक, डी.एन.रोड मुंबई

१५. बापू तुळशीराम ओवे, पोलीस निरीक्षक, गोरेगाव पूर्व, मुंबई

१६. प्रसाद दशरथ पांढरे, पोलीस निरीक्षक, ठाणे,

१७. शिरीष कृष्णनाथ पवार, पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस स्टेशन

१८. सदाशिव एलचंद पाटील, कमांडंट, धुळे

१९. सुरेश पुंडलिकराव गाठेकर, सहाय्यक. उपनिरीक्षक, पीसीआर युनिट वाशिम

२०. दिलीप तुकाराम सावंत, गुप्तचर अधिकारी, एसआयडी हेडक्वार्टर, मुंबई

२१. संतोष सखाराम कोयंदे, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई

२२. चंद्रकांत गुणवंतराव लांबट. पोलीस उपनिरीक्षक रामनगर चंद्रपूर

२३. झाकीरहुसैन मौला किल्लेदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, घाटकोपर, मुंबई

२४. भारत अप्पाजी पाटील, पोलीस निरीक्षक, मुंबई

२५. प्रमोद गंगाधरराव कितेय, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, अमरावती

२६. आनंद भीमराव घेवडे, सहाय्यक. पोलिस उपनिरीक्षक, रायगड,

२७. सुकदेव खंडू मुरकुटे, सहाय्यक. पोलिस उपनिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र

२८. गोकुळ पुंजाजी वाघ, हेड कॉन्स्टेबल, औरंगाबाद

२९. धनंजय छबनराव बारभाई, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर

३०. सुनील विश्राम गोपाळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, एसीबी युनिट, मुंबई

३१. दत्तात्रय राजाराम कडनोर, असिट. पोलिस उपनिरीक्षक, नाशिक शहर

३२. ज्ञानेश्वर पंढरीनाथ आवारी, पोलिस निरीक्षक, मुंबई

३३. रामकृष्ण नारायण पवार, पोलिस निरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे,

३४. ओमप्रकाश गंगाधर कोकाटे, पोलीस निरीक्षक, नागपूर ग्रामीण

३५. सुभाष भीमराव गोयलकर, पोलिस उपनिरीक्षक, विरार (पूर्व) पालघर

३६. संजय सिद्धू कुपेकर, पोलिस उपनिरीक्षक, लव्ह लेन रोड मुंबई

३७. प्रदीप केदाअहिरे, पोलिस उपनिरीक्षक. ठाणे

३८. प्रकाश हरिबा घाडगे, पोलिस उपनिरीक्षक, कांदिवली पोलिस स्टेशन, मुंबई

३९. विजय उत्तम पवार, पोलिस उपनिरीक्षक, फोर्ट, मुंबई

अग्निशमन सेवा, नागरिक सुरक्षा दल तसेच गृहरक्षक दल कर्मचाऱ्यांनाही शौर्य तसेच विशिष्ट सेवेसाठी, त्याच प्रमाणे उल्लेखनीय सेवेसाठी पदक देण्यात येते. याअंतर्गत महाराष्ट्रातील पदक विजेते

महाराष्ट्र

१. काशिनाथ कुरकुटे, असिस्टंट डेप्युटी कंट्रोलर (सीडी)

२. एकनाथ जगन्नाथ सुतार, प्लॅटून कमांडर (होमगार्ड)

३. परमेश्वर केरबा जवादे, ऑफिसर कमांडिंग

४. मोनिका अशोक शिंपी, होमगार्ड



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply