पुणे शहरात पावसाची हजेरी; गारव्यानं नागरिक सुखावले

पुणे शहरासह उपनगरातील काही भागांत मंगळवारी संध्याकाळी पावसानं हजेरी लावली. दिवसभर शहरात खूपच उकाडा जाणवत होता. त्यामुळं पावसाच्या हजेरीनं हवेत गारवा निर्माण झाला असून पुणेकर यामुळं सुखावले आहेत. शहरातील विविध भागात वीस ते पंचवीस मिनिटं पावसानं हजेरी लावली.

हवामान खात्यानं यंदा लवकर मॉन्सून येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाचं आगमन होईल असंही सांगण्यात आलं होतं. पण तत्पूर्वीच आज मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अनेक ठिकाणी कमी जास्त पाऊस बरसला. पुण्यातही काही भागात चांगलाच पाऊस बरसला.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास वाघोली परिसरात सुमारे वीस मिनिटं जोरदार पाऊस बरसला. यामुळं काही भागांमध्ये पाणीही साचलं. तर औंध आणि जिल्ह्यातील काही इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण होऊन पावासाचा शिडकावा झाला. यामुळं शहरातील वातावरणात थंडावा पसरला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply