rayagraj Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेच्या ३४ विशेष गाड्या; १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या काळात भरणार कुंभमेळा

Prayagraj Kumbh Mela : सोलापूर - प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेने ३४ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/पुणे मऊ आणि नागपूर-दानापूर दरम्यान ३४ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

या गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे-

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मऊ कुंभमेळा विशेष

०१०३३ कुंभमेळा विशेष ही गाडी ता. ९, १७, २२, २५ जानेवारी ५, २२ आणि २६ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि मऊ येथे दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता पोहोचेल. एकूण सात गाड्या आहेत. ०१०३४ कुंभमेळा विशेष ही गाडी ता. १०, १८, २३, २६ जानेवारी ६, २३ आणि २७ फेब्रुवारी रोजी मऊ येथून रात्री ११.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता पोहोचेल. एकूण सात फेऱ्या आहेत.

Devendra Fadanavis : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात SIT चौकशी होणार, कुटुंबीयांना १० लाखांची मदत - मुख्यमंत्री

या गाडीसाठी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, तलवारिया, चनेरा, खिरकिया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, चक्की मिर्झापूर, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड हे थाबे आहेत. या गाडीची संरचना दोन वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्डेस ब्रेक व्हॅन अशी आहे.

पुणे-मऊ कुंभमेळा विशेष

०१४५५ कुंभमेळा विशेष पुणे येथून ता. ८, १६, २४ जानेवारी, ६, ८ आणि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.१० वाजता सुटेल आणि २१ फेब्रुवारी रोजी मऊ येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. एकूण सहा फेऱ्या आहेत. ०१४५६ कुंभमेळा विशेष : ९, १७, २५ जानेवारी ७, ९ आणि २२ फेब्रुवारी मऊ येथून ११.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १६.४५ वाजता पोहोचेल.

या गाडीला दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, तलवाडिया छनेरा, खिरकिया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, मिर्झापूर, वाराणसी, शहागंज आणि आझमगड आदी थांबे आहेत. या गाडीची संरचना दोन वातानुकूलित द्वितीय, दोन वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रश्रेणी/चेअर कार, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गाईस ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन अशी आहे.

नागपूर - दानापूर कुंभमेळा विशेष

०१२१७ कुंभमेळा विशेष ही गाडी २६ जानेवारी ५, ९ आणि २३ फेब्रुवारी रोजी नागपूर येथून सकाळी १०.१० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ११ वाजता पोहोचेल. ०१२१८ कुंभमेळा विशेष ता. २७ जानेवारी, ६, १० आणि २४ फेब्रुवारी रोजी दानापूर येथून दुपारी ४ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता पोचेल.

या गाडीला नरखेड, आमला, बैतुल, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, चुनार, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा हे थांबे आहेत. यागाडीची संरचना दोन वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्डस ब्रेक व्हॅन अशी आहे.

कुंभमेळा विशेष ट्रेन क्रमांक ०१०३३, ०१४५५ आणि ०१२१७ साठी विशेष शुल्कासह बुकिंग ता. २० डिसेंबर रोजी सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल. या विशेष गाड्यांमध्ये, सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डबे म्हणून चालतील आणि तिकीट यूटीएसद्वारे बुक केले जाऊ शकतात. या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply