Prakash Ambedkar : भाजपसोबत महाविकास आघाडीनं 20 जागा फिक्स केल्या; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Prakash Ambedkar : राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरुआहे. महाविकास आघाडी ही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना  सोबत घेण्यास अयशस्वी ठरले. त्यानंतर वंचितकडून प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर वंचितकडून राज्यातील इतर मतदार संघातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. आता या उमेदवारांच्या प्रचारासभा देखील सुरू झाल्या आहेत. अशामध्ये आता प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि महाविकास आघाडीवर  गंभीर आरोप केला आहे. भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा महाविकास आघाडीने फिक्स केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांची आज चंद्रपूरमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकरांनी भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा महाविकास आघाडीने फिक्स केल्याचा गंभीर आरोप केला. कल्याण, बीड, बुलडाणा अशा काही जागांची नावं घेत त्यांनी या जागा फिक्स असल्याचे सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Nashik Crime News : मालेगाव पोलिसांची मोठी कामगिरी, नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यास सूरतमधून अटक

छत्रपती शाहू महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय मंडलिक यांच्यावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, 'हू महाराज कोण आहे. त्यांचं कुटुंब कोण आहे. त्यांच्या जवळच्या कुटुंबातील माणसं कोण आहे. त्यामुळे जगाने मान्य केल्यावर दोन गाढवांनी त्यावर कमेंट केल्यावर आपण त्यावर कमेंट करावं असं मला वाटत नाही.', असे म्हणत त्यांनी यावर जास्त बोलणं टाळलं.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत देखील प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, 'निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आत्ताच लावता येणार नाही. कारण या निवडणुकीवर मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी हे 2 फॅक्टर मोठा परिणाम करणार आहेत.' असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. तसंच, 'जरांगे हा फॅक्टर कोणीच लक्षात घेतलेला नाही. गरीब मराठा हा त्यांना आपला मेंटॉर मानतोय. 30 टक्के मतदार जरांगे यांच्या मताप्रमाणे मतदान करणार आणि त्यांनी दोन्ही आघाड्यांना मतदान करू नका असं म्हंटलंय. मध्यंतरी जी आंदोलने झाली त्यामुळे ओबीसी राजकीय दृष्टीने जागृत झाला आहे. म्हणून त्याने बलाढ्य मराठा समाजाला आमच्यातून आरक्षण देणार नाही हे ठणकावून सांगितलं.'



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply