PM Awas Yojana : मुंबईत घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; EWS घटकांच्या उत्पन्न निकषात मोठा बदल

PM Awas Yojana: मुंबई आणि महानगर क्षेत्रात घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणार्‍या घरांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात आर्थिक कमकुवत घटकांसाठी उत्पन्नाचा निकष आता 3 लाख रुपयांवरुन 6 लाख रुपये करण्यात आला आहे. याचा फायदा लाखो नागरिकांना होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश काढला आहे. या निर्णयामुळे म्हाडा, सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणार्‍या एमएमआर क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना नागरी अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रासाठी (एमएमआर) आर्थिक कमकुवत घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) उत्पन्नाचे निकष 3 लाखांऐवजी 6 लाख रुपये करण्यात यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकारने 21 जून 2023 रोजी एक पत्र पाठवून केली होती.

Samruddhi Mahamarg Bus Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, भरधाव खासगी बस ट्रकला धडकली; थरकाप उडवणारी घटना

त्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी संपर्क करुन त्यांना यासंदर्भात विनंती केली होती. केंद्र सरकारने आजच राज्य सरकारला पत्र पाठवून ही मागणी मान्य करण्यात आल्याचे कळविले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply